‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये सिमोना बाइल्सनं जिंकलं 24 वं मेडल, बनली सर्वाधिक पदक जिंकणारी खेळाडू !

नवी दिल्ली : वृ्त्तसंस्था – अमेरिकेची जिमॅनस्टीक सुपरस्टार सिमोना बाइल्सने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. सिमोनाने रविवारी बॅलन्स स्पर्धेत दमदार सादरीकरण केलं. विशेष बाब अशी की, सिमोनाने आपलं 24 वं मेडल जिंकल आहे. यामुळे सिमोना आता वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वात जास्त मेडल जिंकणारी जिम्नॅस्ट बनली आहे.

22 वर्षीय सिमोनाने वर्ल्ड चॅम्पियनशिपचं 18 वं गोल्ड मेडल जिंकत बेलारूसच्या पुरुष जिम्नॅस्ट विताल शेरबोचं वर्ल्ड रेकॉर्ड तोडलं. सिमोना बाइल्सने या आठवड्यातील आपलं चौथं गोल्ड मेडल जिंकलं आहे. तिने 15.066 चा आकडा मिळवत विजयाची नोंद करण्यात यशस्वी झाली.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like