home page top 1

अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ गोळीबार, 1 ठार, 6 गंभीर (व्हिडीओ)

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन (डीसी) येथे रात्री दहाच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार झाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हॉइट हाऊसपासून जवळ असलेल्या वॉशिंग्टनमधील रस्त्यावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून सहा लोक जखमी झाले आहेत.

गोळीबार झाला त्या ठिकाणी स्थानिक पोलिस पोहोचले असून परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

वॉशिंग्टनच्या उत्तर-पश्चिमेकडील कोलंबिया रोडवर ही घटना काल (गरुवारी) रात्री घडली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रूग्णालयात दाखल केलं.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे.

अमेरिकेत गोळीबार होण्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. अमेरिकेत गन कल्चरविरोधात केवळ अनेक निषेध नोंदवले गेले आहेत, परंतु त्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like