USB Cable Private Part | ‘वाढीव’ काम करताना 15 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगात अडकली USB केबल, करावे लागले ‘ऑपरेशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  USB Cable Private Part | लंडनमध्ये 15 वर्षाच्या मुलाने विचित्र प्रयोग करताना यूएसबी केबल आपल्या गुप्तांगात टाकली. ती शरीराच्या बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागले. डॉक्टरांनी सांगितले की हा मुलगा यूएसबी केबलने आपल्या गुप्तांगाची लांबी (USB Cable Private Part) मोजत होता.

रिपोर्टनुसार, हा प्रयोग मुलांसाठी त्यावेळी जास्त धोकादायक ठरला जेव्हा अगोदरच गाठ मारलेली केबल त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली.
यूएसबी केबलची दोन्ही टोके प्रायव्हेट पार्टच्या आत गेली, यामुळे ती काढणे अवघड होते.

यूएसबी केबल अडकल्यानंतर ती काढण्याचा मुलाने भरपूर प्रयत्न केला, परंतु परिणाम असा झाला की, त्याच्या लघवीच्या वाटे जास्त रक्त येऊ लागले.
हे पाहून कुटुंबिय घाबरले आणि ताबडतोब त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
यूरोलॉजी केस रिपोर्टनुसार, यूएसबी केबल गुप्तांगात अशी अडकली होती की डॉक्टर स्पेशल टूलच्या मदतीने सुद्धा ती काढू शकले नाहीत.

मुलाची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून ताबडतोब युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल, लंडन मध्ये त्यास ट्रान्सफर करण्यात आले.
मुलाने विनंती केली की त्याच्या आईच्या अनुपस्थितीत त्याचे ऑपरेशन केले जावे.
त्याने डॉक्टरांना हे सुद्धा सांगितले की, लैंगिक उत्सकतेपोटी त्याने आपले गुप्तांग मोजण्यासाठी असे केले.

एक्स-रे रिपोर्टमध्ये यूएसबी केबलचा आकार आणि पोझिशनबाबत डॉक्टरांनी समजले.
यानंतर मुलाला ताबडतोब सर्जरीसाठी पाठवण्यात आले. सर्जनने प्रथम केबलची गाठ बाहेर काढली.
यानंतर यूएसबीचे उर्वरित भाग बाहेर काढले.

सर्जरी दरम्यान मुलाला कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लीकेशन्स झाले नाहीत. रिकव्हरीनंतर मुलाला घरी पाठवण्यात आले.

 

Web Title : USB Cable Private Part | usb cable stuck in private part during experiment to measure the length of genital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tata Safari Gold | ‘टाटा सफारी’ची गोल्ड एडिशन झाली लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Social Media Market | सन 2025 पर्यंत सोशल मीडियाचं मार्केट 2200 कोटी रुपये होण्याची अपेक्षा – रिपोर्टमध्ये दावा

MLA Rohit Pawar | नगरमध्ये आ. रोहित पवारांचा भाजपला दुसरा धक्का; ‘हा’ बडा कार्यकर्ता राष्ट्रवादीत