जम्मू ग्रीनेड हल्ला: दहशतवादी संघटनेनं केला अल्पवयीन मुलाचा वापर

जम्मू : वृत्तसंस्था – जम्मूच्या बस स्थानकावर झालेल्या हल्ल्यात हातबॉम्ब फेकण्यासाठी चक्क अल्पवयीन मुलाचा वापर करण्यात आला आहे. ही माहिती समोर आल्यावर पोलीसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात २ जण ठार तर ३२ जण जखमी झालेत. अल्पवयीन मुलांसाठी असलेल्या सौम्य शिक्षांमुळे दहशतवाद्यांनी आता दहशत पसरवण्यासाठी अल्पवयीन मुलांना हाताशी धरल्याचं यातून उघड होत आहे.

या मुलाला हातबॉम्ब फेकण्यासाठी ५० हजार रूपये मिळाल्याचे त्याने कबुल केले आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडून ही रक्कम त्याला मिळाली आहे. हा मुलगा अल्पवयीन असून त्याने वयाचे १६ वर्षेही पुर्ण केलेली नाहीत. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे.

ही घटना समोर आल्यानंतर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. त्यानंतर हा परिसर खाली करण्यात आला आहे. सध्या पोलिसांचे पथक घटनास्थळी तपास करत आहेत. पोलिसांनी या मुलाचे आधार कार्ड, इतर कागदपत्रं, शाळेतली कागदपत्रं ताब्यात घेतली. त्यात त्याची जन्मतारीख १२ मार्च २००३ असल्याचे उघड झाले आहे. सध्या पोलीस आता या मुलाचे खरे वय काढण्यासाठी चाचणी करणार आहेत. कुलगामधला हिजबुलचा स्थानिक म्होरक्या फय्याजने या मुलाकडे हातबॉम्ब दिल्याचे उघड झाल्याचेही पोलीसांनी सांगितलं आहे.

ह्याहि बातम्या वाचा

‘लष्कराच्या शौर्याचा वापर राजकीय फायद्यासाठी नको

येरवड्यात बनावट पदवीच्या आधारे नशा मुक्ती केंद्र

नरेंद्र मोदींचे माजी प्रचारप्रमुख काँग्रेसच्या गोटात

सुतारदऱ्यात कोम्बिंग ऑपरेशन, तडीपारावर कारवाई