जेवण ‘रॅप’ करण्यासाठी फॉईल पेपरचा वापर करताय ? ‘या’ अवयवांसाठी अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – किचनमध्ये सर्रास वापरल्या जाणा्ऱ्या वस्तूंपैकीच एक आहे ती म्हणजे अ‍ॅल्युमिनियम फॉईल पेपर . आपणही अनेकदा याचा वापर करत असतो. काही पदार्थ भाजी किंवा चपातीसाठी आपण फॉईल पेपरचा वापर करतो. परंतु तज्ज्ञांचं म्हणणं हे की, जर फॉईल पेपरचा वापर योग्य प्रकारे झाला नाही तर आरोग्याची मोठी हानी होऊ शकते. फॉईल पेपरच्या वापरामुळं कोणत्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागतो याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही फॉईल पेपर वापरत असाल तर त्यावेळी काय काळजी घ्यावी याची माहिती देखील आपण घेणार आहोत.

1) खाद्यपदार्थ दूषित होण्याची शक्यता – जेव्हा आपण फॉईल पेपरमध्ये जेवण पॅक करत असतो तेव्हा त्यात आंबट पदार्थ किंवा भाज्या पॅक करणं टाळायला हवं. कारण आंबट पदार्थ आणि मसालेदार भाज्यांच्या संपर्कात आल्यानंतर अ‍ॅल्युमिनीयमची केमिकल रिअ‍ॅक्शन होत असते. याचाच आपल्या नर्व्हस सिस्टीमवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून मसालेदार पदार्थ यात पॅक करणं टाळायला हवं.

2) इनफर्टीलिटी – एका रिपोर्टनुसार, कोणताही पुरुष जर फॉईल पेपरमध्ये जास्त वेळ असलेल्या अन्नाचं सेवन करत असले तर त्याला इनफर्टीलिटीची समस्या येऊ शकते. एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. यात असंही समजलं आहे की, फाईल पेपरमुळं स्पर्मची संख्या कमी होऊ लागते.

3) हाडं आणि किडनीच दुखणं – रोजच जर तुम्ही अ‍ॅल्युनिमयम फॉईल पेपरमध्ये ठेवलेल्या पदार्थांचं सेवन करत असाल तर हळूहळू हाडंही कमकुवत होऊ लागतात. यामुळं किडनीच्या फंक्शनवरही नकारात्मक प्रभाव पडतो.

4) मेंटल हेल्थ – सतत जर फॉईल पेपरचा वापर केला तर याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इंफर्मेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळं तुमचं मानसिक आरोग्य बिघडतं आणि अल्जायमरची समस्या देखील उद्भवण्याची शक्यता असते. केमिकल रिअ‍ॅक्शन झाल्यानं शरीरातील पेशींचा विकास थांबतो. परिणामी तुमची शारीरिक स्थितीही खराब होऊ शकते.

फॉईल पेपरचा वापर करत असाल तर अशी घ्या काळजी

1) जर जेवण जास्त गरम असेल तर असं जेवण लगेच अ‍ॅल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये रॅप करू नका.

2) अ‍ॅसिडीक, आंबट किंवा मसालेदार पदार्थ असतील तर असे पदार्थ अ‍ॅल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये रॅप करू नका.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like