मराठी भाषेचा वापर जाहिरातींमध्ये करा; मनसे मोर्चा आता पश्चिम रेल्वेकडे

पोलिसनामा ऑनलाईन – मनसेने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) मराठीच्या मुद्यावरून अ‍ॅमेझॉनला जोरदार दणका दिला. मराठीच्या मुद्द्यावरून अ‍ॅमेझॉनला दणका ‘मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही’, असं म्हणत मनसेनं अ‍ॅमेझॉन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. अखेर मनसेच्या तोडफोड वृत्तीने आंदोलनापुढे अ‍ॅमेझॉननं माघारी घेत मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली. लवकरच मराठीचा पर्याय उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अ‍ॅमेझॉननं संकेतस्थळावर दिली आहे. शुक्रवारी अ‍ॅमेझॉननं पुणे आणि मुंबईतल्या गोदामांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

मनसेने आता आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. दरम्यान, मनसेच्या मागणीवर पश्चिम रेल्वेकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरले. मराठी अनिवार्य करण्याबद्दल मागणी करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रकं, जाहिराती प्रसिद्ध होत असतात. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती प्रसिद्ध केली जात असते. पण यातल्या सर्व पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही.

केंद्र सरकारनं प्रत्येक राज्यांनुसार तिथली भाषा वापरणं बंधनकारक केलं आहे. पण असं असतानाही मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याचा आक्षेप मनसेनं नोंदवला आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.