लक्षात ठेवा ! ‘हे’ पदार्थ मायक्रोवेवमध्ये अजिबात गरम करू नका, अन्यथा होऊ शकतो जीवाला धोका, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – अलीकडच्या काळात गॅसऐवजी जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेवचा वापर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र हीच गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. आपण जेव्हा मायक्रोवेव मध्ये जेवण गरम करत असतो त्यावेळी त्यावर बॅक्टेरिया राहण्याची शक्यता असते. ज्यामुळे कॅन्सर सारखा जीवघेणा आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला मायक्रोवेवचा वापर करायचा असेल तर त्यात कोणते पदार्थ गरम करायचे आणि कोणते पदार्थ गरम करायचे नाही हे सुद्धा माहिती असणे तितकंच महत्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत. जे पदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम केल्यानंतर तुमच्या आरोग्यास धोका निर्माण करु शकतात.

१. अंड
जर तुम्ही उकळलेलं अंड गरम करण्यासाठी वापर करत असाल तर अंड फुटेल. तसेच वाफेमुळे जास्त गरम होऊन ते खात असताना तुमचं तोंड देखील भाजू शकते. त्यासाठी तुम्ही उकलल्या अंड्याचे स्लाईस करुन मग गरम करा नंतर त्याचे सेवन करा. असे केल्यास कोणताही धोका निर्माण होणार नाही.

२. भात
फूड स्टॅंडर्ड एजन्सीच्या अभ्यासानुसार मायक्रोवेवमध्ये जर तुम्ही भात करत असाल तर फुल पॉईजन होण्याची शक्यता असते. भातात असणारे बॅसिलस सिरीयस नावाचा बॅक्टेरिया अधिक प्रमाणात असतो. पदार्थ गरम झाल्यामुळे त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात पण स्पोर्स निर्माण होतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड मायक्रोबायोलॉजी यात प्रकाशित झालेल्या शोधानुसार तापमान वाढल्यामुळे त्यात निर्माण होणारे स्पोर्स आपली संख्या वाढवतात. त्यामुळे फूड पॉईजन होण्याचा धोका अधिक वाढतो.

३. पालेभाज्या
तुम्ही पालक, मेथी सारख्या पालेभाज्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणावेळी राहिल्या असतील आणि तुम्ही ते मायक्रोवेवमध्ये गरम केले तर त्यात असणारे नाइट्रेट्स नाइट्रोसॅमाइंसमध्ये बदलतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे शक्य होत असल्यास मायक्रोवेवचा उपयोग कमी करा.

४. लाल-मिरची
ठेचा करण्यासाठी अथवा फोडणी देण्यासाठी जेव्हा तुम्ही लाल मिरची मायक्रोवेवमध्ये गरम करत असा तर ते घातक ठरू शकेल. कारण त्यामधील कैप्साइसिन पदार्थाला चव देण्याचं काम करत असतात. त्याचा वास हवेत पसरल्यानंतर डोळ्यांमध्ये आणि गळ्यात जळजळ होण्याची होण्याची शक्यता असते. ज्या लोंकाना सर्दीचा त्रास होतो. त्या लोकांना शिंका येणं, डोळे लाल होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.