‘चॅटिंग’ करताना इमोजीचा वापर वाढवला तर ‘डेटिंग’ची संधी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – काळ बदलला तसे संवादाची माध्यमेही बदलत गेली. आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आजकाल मोबाईल मधील ‘इमोजी’ हे एक अतिशय प्रभावी माध्यम समजले जाते. तसेच आजकाल एकमेकांशी संवाद साधण्यासाठी समाजमाध्यमांचा (social media) मोठा वापर केला जातो. यालाच तरुणाईच्या भाषेत चॅटिंग (गप्पा मारणे) करणे असे म्हटले जाते.
Emoji
एका नवीन संशोधनातून असे समोर आले कि, चॅटिंग करताना जर इमोजींचा वापर केला तर डेटिंगची शक्यता अधिक वाढते. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्टाग्राम वर आपल्या भावना व्यक्त करताना इमोजींचा वापर अतिशय प्रभावी ठरू शकतो.

डेटिंगच्या संधी वाढतात
हे आपल्या सर्वांना माहित आहे कि, चॅटिंग करताना इमोजींचा वापर केल्यास आपल्या भावना सर्वाधिक प्रभावीपणे पोहचतात. यासाठी आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळ्या इमोजी भेटतात. परंतु एक नवीन संशोधन असे सांगते कि, सोशल मीडिया वर मेसेज/चॅटिंग करताना इमोजींचा अधिक वापर केल्यास डेटिंगच्या संधी अधिक वाढतात. हे संशोधन किन्से इंस्टीट्यूटने केले आहे. या संशोधनामध्ये लोकांची डेटिंग लाईफ आणि लैंगिक इच्छा यांवर केले गेले आहे.
Dating
या संशोधनामध्ये मुख्यत्वेकरून चॅटिंग करताना इमोजींचा वापर यावर जास्त भर दिला गेला आहे. याच्या अभ्यासात ५३२७ लोकांनी भाग घेतला होता. ज्या मधील ३८ टक्के लोकांनी सांगितले कि ते कधीही इमोजींचा वापर करत नव्हते. २९ टक्के लोकांनी सांगितले कि, ते कधी -कधी इमोजींचा वापर करतात.

इमोजीमधून भावना प्रभावीपणे पोचतात
२८ टक्के लोकांनी सांगितले कि, ते नियमितपणे चॅटिंग करताना इमोजींचा वापर करतात. या लोकांनी सांगितले कि, हे आपल्या मित्रांशी, आपल्या प्रेयसीशी बोलताना कायम इमोजींचा वापर करतात. अभ्यास असा सांगतो कि लोक इमोजींचा जास्त वापर करतात त्यांच्या डेटिंग वर जाण्याच्या शक्यता जास्त वाढतात.
Chatting
याशिवाय एका अभ्यासात असेही समोर आले आहे कि, पहिल्या डेटिंग वर जाण्याव्यतिरिक्त इमोजींचा जास्त वापर करणारे आपल्या पार्टनर सोबत लैंगिक संबंध बनवण्याच्या बाबतीत खूप पुढे असतात. इमोजी एक-दुसऱ्यांना भावनात्मक पातळीवर जोडण्यास जास्त मदत करतो. या अभ्यासात २४ टक्के लोकांनी असे सांगितलं कि, संदेश पाठवताना इमोजींचा जास्त वापर केल्यास आपल्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने दुसऱ्यांपर्यंत पोचतात.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like