‘त्या’ स्फोटकांचा वापर संविधान रक्षकांविरोधात : कन्हैया कुमार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

नालासोपारा येथे सनातन संस्थेशी संबंधित वैभव राऊतकडून एटीएसने मोठ्याप्रमाणात स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. तो या स्फोटकांचा वापर गरीब, दलित, आदिवासी, शेतकरी, पत्रकार, बुद्धिजीवी आणि संविधानाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्यांच्या विरोधात करणार होता, खळबळजनक आरोप माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी मुंबई येथे प्रेस क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केला.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2dbf79d8-a6b3-11e8-a62d-5b7d1f311286′]

कन्हैया कुमार म्हणाले, महाराष्ट्र राज्यात सनातन सारख्या संस्था राज्य सरकारच्या सुरक्षेमुळेच अबाधित आहेत. पोलिसांना सरकारकडून जे आदेश मिळतात, पोलीस त्याप्रमाणे काम करतात. त्यामुळेच सीबीआयने गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे स्केच प्रसिद्ध केले असूनही त्यांना अटक केले जात नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांनी केला.

ते पुढे म्हणाले, हैदाराबाद येथील एका कार्यक्रमात हिंदू रक्षण समितीच्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता. ते सर्व लोक भाजपचे सदस्य होते. त्यामुळे भाजप, संघ आणि सनातन सारख्या संघटना एकमेकांशी जुळलेल्या आहेत. हे लोक देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्यासाठी काम करत आहेत. त्यासाठीच ते समाजात जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवत आहेत. संविधानासाठी बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्यातही यांचाच हात आहे, असे कन्हैया कुमार म्हणाले.