स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर व्हा : ब्रिगेडिअर सुनील लिमये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आत्मनिर्भर योजनेतून सोपी व सुटसुटीत कररचना, सोपे सुस्पष्ट कायदे, मनुष्यबळ विकास, कौशल्यविकास, कृषी क्षेत्रातील कच्च्या मालापासून पक्क्यामालापर्यंतच्या पुरवठा साखळीत संख्यात्मक व गुणात्मक सुधारणा करणे. वेगाने अर्थपुरवठा, आर्थिक व्यवहारात पारदर्शक असे उपक्रम राबविले जात आहेत. तंत्रज्ञानाधिष्ठित, तरुण पिढी- मनुष्यबळ विकास, कौशल्यविकास, मागणी- क्षमतेचा पुरेपूर वापर अशा पाच आधारस्तंभांचा समावेश आहे. स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर व्हा, असे ब्रिगेडिअर सुनील लिमये यांनी सांगितले.

पुण्यातील 2-महाराष्ट्र एनसीसी गर्ल्स बटालियनने आत्मनिर्भर भारत योजना राबविली. या योजनेमध्ये 8 कॉलेजेस आणि 8 शाळांतील एक हजार 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे एनसीसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरच्या वतीने आयोजन केले होते. यामध्ये सुभेदार मेजर कृष्णदास, सीनिअर ऑफिसर संध्या पंचमुख, कामिनी फडतरे, आशा धेंडे, यशोधिनी कुलकर्णी, अनिता गायगोले, रेनुका कर्पे, सुजाता गटणे, प्रफुल्लता नांगरे, प्रज्ञा तांबडे, डॉ. सुषमा कदम, काशिफा इनामदार, यशस्वीता वारे, आत्मा बागवान, पल्लवी मालेकर, भाग्यश्री नाले यांचाही या उपक्रमामध्ये मोठा सहभाग होता.

सीओ व्ही व्ही. चव्हाण म्हणाले की, आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये एनसीसी कॅडेट्सने पोस्टर मेकिंग, ब्लॉक्स तयार करून सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेशबुकवर प्रसारित करून समाजामध्ये जनजागृती केली. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतभर राबविली जात आहे. त्याअनुषंगाने एनसीसी छात्रांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच एनसीसी छात्रांनी व्हीडिओ, रांगोळी, चित्रे, कवितांच्या माध्यमातून आत्मनिर्भर संकल्पनेवर प्रकाश टाकला. हा उपक्रम 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान सुरू आहे. एक भारत श्रेष्ठ भारत, स्वदेशी वस्तूंचा वापर करा, यासारखे स्लोग्लन्स तयार करून जनजागृती केली. आत्मनिर्भर भारत या विषयावर प्रतिज्ञा घेण्यात आली. या कामामध्ये एनसीसीची टीम जीसीआय दिपाली दास, जीसीआय रिटा खंडागळे, जीसीआय नंदिता यांनी या कामाचे नियोजन केले. सुभेदार मेजर लक्ष्मण यांनी काम पाहिले.

सीनिअर ऑफिसर संध्या पंचमुख म्हणाल्या की, एनसीसी कॅडेट्स प्लगमध्ये प्रतिज्ञा व व्हीडिओ सोशल मीडियावर पाठवले आहेत. सोशल मीडिया त्यांना एक प्लॅटफॉर्मच मिळाला आहे. कॅडेट्स व्हीडिओ, ऑडिओ, व्हॉट्सॲप, फेसबुकच्या माध्यमातून ब्लॉक्स शेअर केले जात आहेत. ड्रॉइंग कॉम्पिटिशन ऑनलाइनमध्ये सहभागी होत आहेत. ट्री प्लॅन्टेशन करीत आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये स्वदेशीला महत्त्व देण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.