‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकजण केसातील कोंड्यामुळे परेशान असतात. याशिवाय केसांच्या इतरही समस्या असतात. यामागे अनेक कारणे आहे. धूळ, प्रदूषणामुळे कोंडा आणि त्वचेच्याही समस्या ओढवतात. केसांवरही याचा परिणाम होतो. कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण शॅम्पू आणि तेलाचा वापर करताना दिसतात. यात असणाऱ्या केमिकलमुळे समस्या आणखी वाढते. कोंडा आणि केसातील इतर समस्यांवर उत्तम उपाय म्हणजे तेलाने डोक्याला मालिश करणं. यामळे रक्तप्रवाह सुरळीत होतोच शिवाय केसांना पोषण मिळतं. कोणतं तेल केसांसाठी फायदेशीर आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

1) खोबऱ्याचे तेल – तुम्हाला माहिती नसेल परंतु खोबऱ्याचे तेल खूप गुणकारी आहे. यात अ‍ॅटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. या तेलाच्या वापराने केसातील कोंडा दूर होतो. खोबऱ्याचे तेल कोमट करा आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. या तेलाने स्कॅल्पला 5 मिनिट मसाज करा. 45 मिनिटांनी केस धुवून टाका. या उपायाने तुम्हाला लवकरच फरक जाणवेल.

2) मोहरीचे तेल – मोहरीच्या तेल्याने केसांना मालिश केलं तर रक्तप्रवाह सुरळीत होतो. या तेलात अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. या तेलाच्या मसाजने केसातील कोंड्यासोबतच इतरही समस्या दूर होतात. 1 चमचा मोहरीचे तेल घ्या त्यात 1 चमचा खोबऱ्याचे तेल आणि 1 चमचा कॅस्टरऑईल मिक्स करा. तयार झालेले मिश्रण केलांच्या मुळांना लावत मसाज करा. यानंतर 45 मिनिटांनी शॅम्पूने केस धुवून टाका. हा उपाय तु्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता.

3) ऑलिव्ह ऑईल – केसांशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी एक बाऊलमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि 1 चमचा हळद घालून मिश्रण तयार करा. यानंतर हलक्या हाताने केसांच्या मुळांना लावत मसाज करा. एका तासाने शॅम्पूने केस धुवून टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा प्रयोग करा. ऑलिव्ह ऑईलमध्ये केसांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.

4) तिळाचे तेल – खास केसातील कोंड्याच्या समस्येने जे लोक परेशान झाले आहेत त्यांच्यासाठी तिळाचे तेल जास्त फायदेशीर ठरते. तिळ्याच्या तेलाने तुम्हाला तुमच्या केसांना मसाज करायची आहे. यानंतर एका तासाने केस कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा प्रयोग तुम्ही करू शकता.

5) कडुलिंबाचे तेल – कडुलिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी फंगल गुणधर्म असतात. यामुळे केसातील कोंडा दूर करण्यास मदत होते. एका बाऊलमध्ये 1 चमचा कडुलिंबाचे तेल घ्या. त्यात 1 चमचा खोबऱ्याचे तेल मिक्स करा. तयार झालेल्या मिश्रणाने 5 मिनिट केसांच्या मुळांना मसाज करा. अर्ध्या तासाने शॅम्पूने केस धुवून टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे.

You might also like