स्प्लिट स्क्रीनने एकाच वेळी करा दोन अ‍ॅपचा वापर, जाणून घ्या ही सोपी ट्रिक

पोलिसनामा ऑनलाइन – अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अनेक अशी कामाची फिचर असतात, ज्यांच्याबाबत आपल्याला माहिती नसते. तुम्ही फोनमध्ये रिंगटोनपासून स्क्रीन, वॉलपेपर, होम पेज स्वता सेट करू शकता. परंतु, तुम्हाला स्प्लिट स्क्रीनच्या ऑपशनबाबत माहिती आहे का? आम्ही सांगणार आहोत तुम्हाला स्मार्टफोनच्या या सेटींगबाबत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनची स्क्रीन बदलू शकता. यास स्प्लिट स्क्रीन म्हणतात. या फिचरद्वारे स्मार्टफोनची स्क्रीन दोन भागात विभागता येते. जर तुम्ही सुद्धा अनेक अ‍ॅप यूज करत असाल आणि हे फिचर वापरायचे असेल तर आम्ही आपल्याला स्टेप-बाय-स्टेप पूर्ण पद्धत सांगणार आहोत.

फोनमध्ये स्प्लिट स्क्रीन कसे कराल

1 स्प्लिट स्क्रीनसाठी तुम्हाला सर्वप्रथम फोनच्या स्क्रीनवर जावे लागेल. येथे तुम्हाला रिसेंट अ‍ॅप्सचे एक बटन दिसेल, ज्यावर क्लिक करा. आता तुम्हाला रिसेंट अ‍ॅप्स दिसतील.
2 आता तुम्ही ज्या अ‍ॅपला स्प्लिट स्क्रीनप्रमाणे वापरणार आहात, त्यास होल्ड करून ठेवावे लागेल.
3 आता तुमच्या समोर मेन्यू बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये णीश ळप डश्रिळीं डलीशशप तळशु चा ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.
4 आता ज्यास तुम्ही अर्धी स्क्रीन म्हणून वापरायचे आहे, त्या दुसर्‍या स्क्रीनवर क्लिक करा.
5 येथे तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात विंडोच्या साइजला अ‍ॅडजस्ट करू शकता. येथे तुम्हाला एक ब्लॅक लाइन दिसेल, जी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता.

आता तुम्ही तुमच्या स्माटफोनमध्ये एकाचवेळी दोन स्क्रीन वापरू शकता. यामुळे तुम्हाला जास्त वापरले जाणारे अ‍ॅप शोधणे सोपे होईल. लक्षात ठेवा हे स्प्लिट स्क्रीन फिचर तुम्ही स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड व्हर्जन 9.0 आणि अँड्रॉइड 10 वरच वापरू शकता.