home page top 1

युज्ड कार डिलर्स असोसिएशनची स्यापना

27 सप्टेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वापरलेल्या गाड्यांची विक्री करणारे विक्रेते म्हणजेच युज्ड कार डिलर्स प्रथमच एकत्र येऊन युज्ड कार डिलर्स असोसिएशनची स्थापना केली असून 27 सप्टेंबर रोजी त्याचे उद्घाटन पुणे पोलिस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते रेसिडेन्सी क्लब येथे संध्या 7 वाजता होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विनोद आहिर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपाध्यक्ष सचिन साकोरे, सचिव निलेश भागवत, खजिनदार आशिष खंडेलवाल, अतुल जैन, राजेश ढवळे, मोहसिन सय्यद, प्रकाश उदेशी उपस्थित होते. या उद्घाटन समारंभास विन्टेंज कार म्युझियमचे मालक सुभाष सणस व शहरातील सर्व जुने विक्रते उपस्थित राहणार आहेत.

संस्थेच्या स्थापनेचा मुख्य हेतू वापरलेल्या प्रमाणित आणि दर्जेदार गाड्यांच्या विक्रिसाठी विक्रेत्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे, व्यवहारात पारदर्शकता आणून ग्राहकांची फसवणूक टाळणे तसेच आरटीओ व शासनाशी समन्वय साधणे, हा आहे.

Visit :- policenama.com

Loading...
You might also like