1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार ! जाणून घ्या किती खर्च करावा लागेल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय बाजारात सेकंड हँड कार ( Second Hand Car) ची मागणी कोरोना काळात जास्त वाढली आहे. अनेक लोक व्हायरसच्या भितीने पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत नाहीत. याच कारणामुळे जुन्या वाहनांची विक्री करणार्‍या ऑनलाइन पोर्टल्सवर ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे.

जर तुम्ही सुद्धा जुनी गाडी खरेदी ( Second Hand Car ) करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर देशातील दिग्गज वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकी सुद्धा सेकंड हँड गाड्या विकते. कंपनी आपल्या True Value स्टोअरद्वारे आपल्या जुन्या गाड्या विकते. True Value वेबसाइटद्वारे तुम्ही घरबसल्या स्टोअरमधील कारची माहिती मिळवू शकता. यानंतर स्टोअरमध्ये जाऊन त्या कारचे फिजिकली निरीक्षण करू शकता. या प्लॅटफॉर्मद्वारे मारुतीने आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त जुन्या कार विकल्या आहेत.

हे आहेत काही पर्याय :-

1. Wagon R LXI :
कंपनी 2017 चे मॉडल व्हॅगन आर एलएक्सआयची विक्री करत आहे. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायासह असलेली ही कार 3,30,000 रुपयांत उपलब्ध आहे. ती फर्स्ट ओनर कार असून दिल्लीत उपलब्ध आहे. कार 89,303 किलोमीटर धावली आहे.

2. Wagon R LXI (O) :
कंपनी 2018 मॉडलची व्हॅगन आर एलएक्सआय (ओ) सेल करत आहे. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायासह येणार्‍या या कारची किंमत 3,85,000 रुपये आहे. दिल्लीत उपलब्ध असलेली ही फर्स्ट ओनर कार 87,240 किलोमीटर धावलेली आहे.

3. Wagon R VXI AMT (O) :
कंपनी 2017 मॉडलची व्हॅगन आर व्हीएक्सआय एएमटी (ओ) कार सेल करत आहे. पेट्रोल इंजिनच्या या कारची किंमत 3,80,000 रुपये आहे. फर्स्ट ओनर असलेली ही कार दिल्लीत उपलब्ध असून ती 34,200 किलोमीटर धावली आहे.

हे देखील वाचा

‘महाविकास’मध्ये ‘तणाव’; राष्ट्रवादीचं मिशन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Burglary in Pune | आंबेगाव पठार परिसरात भरदिवसा घरफोडी; 10 लाखाचा ऐवज लंपास

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू

धक्कादायक ! झोपेत असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या; सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

 

Web Titel : used maruti wagon r cng car with 1 year warranty here know how much it will cost