युजर म्हणाला, ‘पैसे डोनेट कर’ ! अभिनेत्री डेजी शाह म्हणाली – ‘चिंधी ज्ञान मला नको देऊस’

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरस या जागतिक महामारीसोबत लढण्यासाठी अनेक कलाकार पुढे येत डोनेशन देताना दिसत आहेत. अनेकांनी तर त्यांच्या डोनेशनबद्दल सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. काही असेही कालाकार आहेत ज्यांनी दिलेल्या योगदानाचा खुलासा केलेला नाही. अशाही काही घटना पाहायला मिळाल्यात की, काही युजर्सनी सोशलवर डोनेशनसाठी सेलेब्स ट्रोल केलं किंवा त्यांना डोनेशन करण्यासाठी सल्ला दिला. अभिनेत्री डेजी शाह हिच्यासोबत असंच काहीसं झालं ज्यानंतर डेजीनं ट्रोलरला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

View this post on Instagram

Discovering new filters on IG be like! 😳 #thingsyoudo

A post shared by Daisy (@shahdaisy) on

image.png

डेजीनं एक फिल्टर वापरून एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. यानंतर एकानं यावर कमेंट करत म्हटलं की, “इथं काहीही पोस्ट करण्यापेक्षा काही पैसे डोनेट कर आणि इतरांनाही तसं करण्यासाठी प्रोत्साहित कर.” या युजरला डेजीनं चांगलंच उत्तर दिलं. डेजी म्हणाली, “माझ्या इंस्टाग्रामवर मला चिंधी ज्ञान देणं बंद कर. मी माझं काम करत आहे. किमान तुझ्यासारख्या लोकांसाठी तरी मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही जे फक्त बोलतात प्रत्यक्ष करत मात्र काहीही नाही.”

image.png

डेजीचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. ट्रोलरला दिलेल्या प्रत्युत्तरामुळं डेजी चर्चेचा हिस्सा बनली आहे. इतर अनेक युजर्स आहेत ज्यांनी डेजीच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. काहींनी डेजीचं समर्थन केलं आहे तर काहींनी तिला सवालही विचारले आहेत.

View this post on Instagram

❤️

A post shared by Daisy (@shahdaisy) on

View this post on Instagram

🐶

A post shared by Daisy (@shahdaisy) on

View this post on Instagram

💖

A post shared by Daisy (@shahdaisy) on

View this post on Instagram

🕯️

A post shared by Daisy (@shahdaisy) on

 

You might also like