31 ऑक्टोबर पर्यंत केलं नाही ‘हे’ काम तर कोट्यावधी युजर्सचे मोबाईल नंबर होणार बंद, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्रायने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील जवळपास 7 कोटी ग्राहकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट केला नाही तर ३१ ऑक्टोबरनंतर बंद होणार आहे. 2018 च्या सुरुवातीला एअरसेलने आपली सेवा बंद केली होती. त्यावेळी ट्रायला विंनती करून कंपनीने यूनीक पोर्टिंग कोड्स देत आपल्या ग्राहकांचे क्रमांक सुरु ठेवले होते. ट्रायच्या माहितीनुसार सध्या एरसेलचे 7 कोटी ग्राहक असून नियोजित तारखेच्या आत नंबर पोर्ट न केल्यास सेवा बंद केली जाणार आहे.

करोडो ग्राहक आहेत
जानेवारी 2018 मध्ये कंपनीने सेवा बंद केली त्यावेळी कंपनीचे 9 कोटी ग्राहक होते. त्यानंतर ट्रायने त्यांना एडिशनल कोड देत ग्राहकांचे क्रमांक सुरु ठेवले. मात्र मागील दीड वर्षात जवळपास दोन कोटी ग्राहकांनी आपले क्रमांक पोर्ट करून घेतले असून सध्या कंपनीचे 7 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे आता ट्रायच्या सूचनेनंतर 31 ऑक्टोबर 2019 च्या आत क्रमांक पोर्ट करून घ्यावे लागणार आहेत. अन्यथा त्यांची सेवा बंद केली जाणार आहे.

अशाप्रकारे जनरेट करा यूपीसी –
सेवा बंद करताना कंपनीने आपल्या ग्राहकांना वेबसाईटच्या माध्यमातून एक यूपीसी जनरेट करण्याची सुविधा दिली होती. मात्र आता ती वेबसाईट देखील बंद झाली असून ग्राहकांकडे क्रमांक पोर्ट करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. मात्र यासाठी काळजी करण्याची गरज नसून तुमच्या मोबाईलवरून पोर्ट असे टाईप करून 1900 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा. त्यानंतर तुम्हाला यूनीक पोर्टिंग कोड मिळेल. त्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीचा क्रमांक घ्यायचा आहे, त्या ठिकाणी जाऊन हा क्रमांक दाखवून क्रमांक पोर्ट करू शकता.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या