पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली आहे. त्या सांगवीचे प्रतिनिधीत्व महापालिकेत करत होत्या. ढोरे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. त्यांना तब्बल 74 मते पडली.
महापौर पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा पराभव झाला असून त्यांना 41 मते पडली आहेत. निवडणुकीमध्ये अपक्षांनी भाजपला तर शिवसेनेने महाविकास आघाडीचा पॅर्टन पिंपरीत राबवत राष्ट्रवादीला मतदान केले.

या निवडणुकीत मनसेने तटस्थ भूमिका घेतली आहे. निवडणुकी दरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी कामकाज पाहिले. सकाळी 11 वाजता महापौर पदाच्या अर्जांची छाणनी सुरू झाली. अर्ज परत घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माई काटेंनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी प्रयत्न केले मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आता उषा उर्फ माई ढोरे या पिंपरी-चिंचवडच्या 26 व्या महापौर बनल्या आहेत.

Visit : Policenama.com