महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी उषा मोटेगावकर

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी लासलगाव येथील सौ. उषा दत्तात्रय मोटेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. नासिक येथे नुकत्याच महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्यव्यापी बैठकीत प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक सूर्यवंशी व जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र मोटेगावकर यांना देण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील नाभिक समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. उषा मोटेगावकर या निवडीचे नारायणराव यादव, संजय गायकवाड, अरविंद देसाई, दत्तात्रय वाघ, रमेश आहेर, अनिल वाघ, विलास सुर्यवंशी, गणेश जाधव, तुषार जगताप, अशोक जगताप, नितीन वाघ, राजाभाऊ जाधव, दत्ता वाघ,संदीप वाघ, अभिजित जगताप, विजय वैद्य, गिरीश बोरसे, पंकज सुर्वे, मयुर देसाई, अविनाश देसाई, नाना संत, रमेश वाघ, शशी महाले यांच्यासह पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.

लवकरच नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करून महिला कार्यकारणी नेमणार असल्याची माहीती सौ उषा मोटेगावकर यांनी दिली आहे.