काय सांगता ! होय, चक्क बस चालवताना गेअर बदल्यासाठी त्यानं ठेवल्या मुली (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहचालकांच्या हलगर्जीपणामुळे अनेकदा चुकी नसतानाही अनेकांना शिक्षा भोगायला लागल्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालवतानाचे अनेक नियम कडक देखील करण्यात आलेले आहेत. वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे दोन जणांचा जीव धोक्यात आल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

केरळमधील हा धक्कादायक प्रकार असून यामध्ये वाहन चालकाने मस्करी करण्याच्या नादात दोन मुलींचा जीव धोक्यात घातला आहे. वाहन चालकाने अतिशोक्ती करत सोबत बसलेल्या मुलींना गिअर टाकण्यासाठी सांगितले होते. यामुळे या वाहन चालकाचा परवाना देखील रद्द करण्यात आलेला आहे.

केरळ गोवा अशा पिकनिकसाठी निघालेली मुलींच्या बसमधील हा प्रकार असल्याचे व्हिडीओवरून समजते. केरळमधील एका वृत्तवाहिनीने देखील या व्हिडिओबाबत खुलासा केलेला आहे.

काय आहे नेमका हा व्हिडीओ
या व्हिडिओमध्ये दोन मुली ड्रायव्हरच्या बाजूला बसून गेअर बदलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरटीओने सहा महिन्यांसाठी या चालकाचा वाहन परवाना रद्द केला आहे. कारवाई केलेल्या वाहन चालकाचे नाव शाजी असे आहे.

Visit :  Policenama.com