उमेदवार हरला, पैजही हरली, भादरावी लागली राखलेली मिशी

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत आपापल्या मतदारसंघातील उमेदवारांच्या जय पराजयावर समर्थकांनी पैजा लावल्याच्या मजेशीर घटना समोर आल्या आहेत. असाच एक गमतीशीर प्रकार समोर आला आहे. संजयमामा शिंदे जिंकतील अशी त्याने पैज लावली. मात्र पैज हरल्याने त्याला चक्क मिशीच भादरावी लागली.

पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात औदुंबर चव्हाण आणि शुभम फटे या दोन तरुणांमध्ये पैज लागली होती. माढा लोकसभा मतदारसंघात संजयमामा शिंदे आणि शिवसेना भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला.

चव्हाण हे संजयमामा शिंदे यांचे तर फटे हे युतीचे समर्थक होते. त्यात संजयमामा शिंदे हरल्याने फटे हे पैज जिंकले तर चव्हाण पैज हरले. त्यानंतर शुक्रवारी चव्हाण यांना आपली मिशी भादरावी लागली. तर त्यांचे मित्र सचिन माळी, समाधान माळी यांना साक्षीदाराची भूमिका पार पाडली.