आता WhatsApp व्दारे करू शकता SIP, इंडेक्स फंडासह अनेक ठिकाणी गुंतवणूक, ‘या’ नंबरवर करावा लागेल मेसेज

नवी दिल्ली : यूटीआय (UTI) ने गुंतवणूकदारांसोबत संपर्क वाढवण्यासाठी ऍडव्हान्स WhatsApp चॅट सर्व्हिस लाँच केली आहे. गुंतवणूकदारांसाठी ही सर्व्हिस 24X7 उपलब्ध असणार आहे. UTI म्युच्युअल फंडाची ही एक्सक्लूजिव्ह सर्व्हिस सध्याच्या गुंतवणूकदारांसह संभावित गुंतवणूकदारांसाठीही उपलब्ध असणार आहे.

WhatsApp चॅट सर्व्हिसचे उद्देश टेक्स्ट-आधारित चॅट, अपडेट आणि इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून गुंतवणूक इंटरफेसला प्रोत्साहन देणे हा आहे. हे Opt-In युजर्सलाही कंपनीच्या प्रोडक्टमध्ये रुची दिसते. UTI म्युच्युअल फंडने +91-7208081230 या नंबरवरून सर्व्हिस लाँच केली आहे. या नव्या सर्व्हिस चॅट पर्यायासह 24X7 मदत करते. गुंतवणूकदार NAV, पोर्टफोलिओ डिटेल्स, अकाउंट आणि कॅपिटल गेन स्टेटमेंट, UFC एड्रेड आणि मेसेजिंग एप्लिकेशनच्या माध्यमातून माहिती घेऊ शकतात.

WhatsApp Chat च्या माध्यमातून करता येणार व्यवहार

युजर्सला WhatsApp Chat च्या माध्यमातून आर्थिक व्यवहारही करता येऊ शकतो. कंपनीच्या गुंतवणूकदाराने सांगितले, की गुंतवणूकदार Systematic Investment Plans (SIPs) मध्ये गुंतवणूक, STP, Index Funds मध्ये सहजपणे गुंतवणूक करू शकतील. याशिवाय 24X7 चॅटच्या माध्यमातून 30 पेक्षा जास्तवेळा देवाण-घेवाणचा व्यवहारही करू शकतात.

E-mail ID ही करता येणार अपडेट

युजर्सला WhatsApp Chat सेवांचा वापर करून मोबाईल क्रमांक आणि E-mail ID ही अपडेट करता येऊ शकणार आहे. हा UTI म्युच्युअल फंडला मार्केटिंग आणि गुंतवणूक सहाय्यता सेवांना मजबूत करण्यासाठी मदत करणार आहे.