‘या’ पक्ष प्रमुखासह संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – देशात भाजपमध्ये प्रवेश करण्याची चढाओढ लागलेली असतानाच ओडिसा राज्यात तर एक संपूर्ण पक्षाच भाजपमध्ये आला आहे. लोकसभा निवडणुकी सोबतच ओडिसाच्या विधान सभेची निवडणूकही पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने ओडिसातमध्येही नेत्यांची आवक करायला सुरुवात केली आहे.

ओडिसातील उत्कल भारत पक्षाचे संस्थापक खरबेला स्वैन हे भाजपमध्ये परत आले आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भाजपच्या मुख्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. खरबेला स्वैन यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा उत्कल भारत नावाचा पक्ष स्थापन केला होता. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी आपण भाजपमध्ये दाखल झालो आहे असे खरबेला स्वैन यांनी म्हणले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी येथील मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सरकारवर ही त्यांनी निशाणा साधला आहे. तर मायावती, ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू यांच्या प्रमाणे नवीन पटनाईक यांना देखील केंद्रात कंकुवत सरकार पाहिजे आहे असे धर्मेद्र प्रधान म्हणाले आहेत.

Loading...
You might also like