वृद्ध कलावंत मानधन योजनेची थकीत रक्कम कलावंतांच्या खात्यात जमा !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सर्व कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांना जगणे मुश्किल झाले होते. त्याशिवाय वृद्ध कलावंतांना शासनाच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम बंद करण्यात आले होते.त्यापार्श्वभूमीवर प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मांडल्या होत्या. त्या मागणीला यश आले आहे.

सरकारने मानधन बंद केल्यामुळे वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शिंदे यांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने वृद्ध कलावंतांच्या दरमहा मानधनाची थकीत रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे वृध्द कलावंतांना दिलासा मिळाला आहे. वृद्ध कलावंतांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अथवा इतर आरोग्य योजनेत सहभागी करण्याच्या मागणीवर विचारा करावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.