‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला ऑडिशनलाच करावा लागला होता SEX SCENE

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अनेक अशा ॲक्ट्रेस आहेत ज्यांनी कास्टींग काऊचला घेऊन सवाल उपस्थित केले आहेत. यानंतर असाच एक खुलासा समोर आला आहे. एका बॉलिवूड अभिनेत्रीने करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक वाईट अनुभव शेअर केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री अदिती राव हैदरी आहे. एका टॉक शोमध्ये बोलताना तिने आपला अनुभव शेअर केला आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा 2011 साली आलेल्या ये साली जिंदगी या सिनेमासाठी अदिती ऑडिशन देत होती.

अदिती म्हणाली की, “ये साली जिंदगी या सिनेमाच्या ऑडिशन वेळी मला एका अनोळखी सोबत इंटिमेट सीन देण्यास सांगण्यात आले होते. मला एका अशा माणसासोबत इंटिमेट व्हायचं होतं ज्याला मी ओळखतही नाही.”

View this post on Instagram

Finding my tone #BlackAndWhite #WhiteTseries

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on

काही काळानंतर अदितीला समजलं की, तो व्यक्ती बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह आहे. या सिनेमात तो अदिती सोबत होता. अदिती म्हणाली की, “त्यावेळी मी त्यांना ओळखत नव्हते. ते खूपच लंबू आणि धिप्पाड होते. मी विचार करत होते की हे नेमके काय चालले आहे. परंतु ते खूपच नम्रही होते.”

दरम्यान या टॉक शो मध्ये बोलताना अदितीने तिच्या आयुष्यातील इतर गोष्टींवरही भाष्य केलं. परंतु तिच्या खासगी आयुष्याबाबत तिने जास्त काही सांगितले नाही. ती म्हणाली की, “जेव्हा मी पाचवीमध्ये होते तेव्हा मला पहिले प्रेमपत्र मिळाले होते.” अदितीने तिच्या डेटींग गेमबद्दलही सांगितलं. 21 व्या वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रा सोबत अदिती विवाहबद्ध झाली होती. त्यानंतर दोघे वेगळेही झाले होते. .

View this post on Instagram

#Spotted

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on

View this post on Instagram

#AnimeSeries

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on

You might also like