नागरिकांनो, Voter id हरवलंय तर मग आता ‘नो-टेन्शन’ ! निवडणूक आयोगानं केलीय नवीन सोय, ‘या’ पध्दतीनं मिळवा ओळखपत्र

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – जर तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असेल तर त्याची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्लालयाचे हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत सोमवारपासून (दि.25 जानेवारी) e-EPIC सुविधा सुरु केली आहे. याद्वारे तुम्ही घरबसल्या मतदार ओळखपत्राची पीडीएफ कॉपी डाउनलोड करु शकाल. मात्र, ऑनलाइन ओळखपत्र मोबाईलवर डाउनलोड करून तो मोबाईल निवडणूक केंद्रावर मतदाराला घेऊन जाता येईल का, यासंदर्भात तूर्तास तरी आयोगाचे काही आदेश नाहीत. त्यामुळे ऑनलाइन डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी लागणार आहे.

आतापर्यंत मतदार केंद्रावर लागणारे ओळखपत्र निवडणूक विभागाकडून प्रत्यक्ष दिले जात होते. मात्र, सोमवारपासून (दि. 25 ) देशातील मतदार निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून पीडीएफ स्वरूपातील ओळखपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ती वापरता येणार आहे. विशेषत: नवमतदारांना त्यांच्या मोबाईल किंवा डेस्कटॉपवर ओळखपत्र डाउनलोड करता येणार आहे. सध्या सोमवारपासून ते येत्या 31 जानेवारीपर्यंत विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यात नावनोंदणी, मोबाईल क्रमांक जोडलेल्या नवमतदारांना एसएमएसद्वारे लिंक येईल. 1 फेब्रुवारीपासून मतदारांना लिंकद्वारे निवडणूक ओळखपत्र (ई-इपिक) डाउनलोड करता येणार आहे.

कसे मिळवाल मतदान ओळखपत्र
1) https://nvsp.in संकेतस्थळावर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर इपिक क्रमांक किंवा अर्जाचा संदर्भ टाकायचा. सिस्टिमद्वारे मोबाईलवर ओटीपी क्रमांक येईल. त्यानंतर ओटीपी टाकून ओळखपत्र डाउनलोड करावे.