काँग्रेसला मोठा धक्का ! 3 वेळा खासदार राहिलेल्या ‘या’ नेत्या करणार भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्य़े काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. प्रतापगढच्या माजी खासदार राजकुमारी रत्ना सिंह या काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हातात घेणार आहे. रत्ना सिंह या माजी परराष्ट्र मंत्री राजा दिनेश सिंह यांच्या मुलगी आहेत आणि काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. प्रतापगड विधानसभेच्या पोट निवडणूकीआधीच रत्ना सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मंगळवारी रत्ना सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोटनिवडणूकीत आपला मित्र पक्ष अपना दलचे उमेदवार राजकुमार यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. या सभेत राजकुमारी रत्ना सिंह देखील उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचा पुत्र भुवन्यू सिंह देखील होता.

राजकुमारी रत्ना या लखनऊमध्ये भाजपात प्रवेश करणार होत्या. मात्र या दरम्यान विधानसभा पोटनिवडणूक असल्याने त्यात बदल करण्यात आले. राजकुमारी रत्ना सिंह प्रतापगड मतदारसंघात 1996, 1999 आणि 2009 मध्ये खासदार होत्या. 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला होता.

रत्ना सिंह माजी परराष्ट्र मंत्री दिनेश सिंह यांची मुलगी आहे. राजा दिनेश सिंह प्रतापगढमध्ये चार वेळा खासदार होते. रत्ना सिंह यांचे कुटूंब सुरुवातीपासून काँग्रेसशी जोडलेले आहे. त्यांच्या कुटूंबाचे रामपाल सिंह काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. तर वडील राजा दिनेश सिंह इंदिरा गांधी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते. दिनेश सिंह माजी पंतप्रधान आणि राजीव गांधींचे जवळचे मानले जात असत. त्यामुळे नेहरु गांधी कुटूंब त्यांना महत्व देत असे.

यामुळे 2019 साली लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने प्रतापगढमधून प्रमोद तिवारी यांच्या खंबीर नेतृत्वानंतर रत्ना सिंह यांना तिकीट दिले. परंतू यात रत्ना सिंह यांचा पराभव झाला होता. यामुळे संजय सिंह यांच्या नंतर काँग्रेसला हा तिसरा धक्का मानला जात आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी