उत्तर प्रदेश : मैनपुरीजवळ भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

मैनपुरी : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथे खासगी बस पलटून झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून ३५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. ही बस जयपूरवरुन गुरसहायगंजला जात होती. अति वेगामुळे बस पलटल्याचे सांगण्यात येत आहे.

दन्नाहारच्या कल्लू मढैया किरतपुरजवळ बस डिवायडरला धडकली. ज्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी बसमधून बाहेर काढले. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.