मेथीची भाजी समजून खाल्ला गांजा, नेमका काय घडला प्रकार वाचा

कन्नोज : वृत्तसंस्था – मेथीची भाजी समजून गांजा खाल्ला आणि बेशुद्ध झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील कन्नोज परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

संबंधित कुटुंबीयांनी मेथीची भाजी खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला बेशुद्ध पडले. त्यांना स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी या प्रकऱणी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका तरुणाने मजेमध्ये मेथीची भाजी आहे असे सांगून गांजा दिला होता. कोतवाली भागातील मियागंज गावात नवल किशोर नावाच्या व्यक्तीने ओमप्रकाश यांचा मुलगा नितेशला कोरडी मेथीची भाजी असल्याचे सांगून एक पिशवी दिली. त्यानेही कोरडी मेथीची भाजी आहे असे समजून भाजी बनवली आणि खाल्ली.

संध्याकाळी मात्र या संपूर्ण कुटुबाची तब्येत बिघडली. या घटनेची माहिती शेजारच्यांनी तातडीने पोलिसात कळवली आणि बेशुद्ध पडलेल्या नितेशसह त्याच्या कुटुंबियांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी भाजीचे सॅपल्स ताब्यात घेतले आहेत. भाजी म्हणून गांजा विकणार्‍या नवल किशोर नावाच्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.