चेंगट पतीला कंटाळून तिनं केलं शेजार्‍याशी ‘झेंगाट’, पुढं त्याच्याशी लग्‍न करण्यासाठी केली पतीची ‘गेम’

लखनौ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये गायब असणाऱ्या तरुणाला घेऊन पोलिसांनी तीन महिन्यांनंतर सनसनीखेज खुलासा केला आहे. तरुणाचा खून केल्याच्या आरोपाखाली त्याची पत्नी आणि त्याच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. सोमवारी पोलिसांनी एक मृतदेह ताब्यात घेतला आहे. सत्यपाल म्हणून त्याची ओळख पटली आहे. यानंतर पोलिसांनी तीन महिन्यांपासून गायब ३४ वर्षीय तरुणाला या प्रकरणी अटक करत जेलमध्ये पाठवलं आहे.

खेडा राठोर या गावाताली हा प्रकार आहे. जिथे राहणारा सत्यपालच्या गायब होण्याबाबत चुलत भाऊ सिद्धार्थनाथने ३० मार्च रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सिद्धार्थनाथने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, त्याचा चुलत भाऊ सत्यपाल ३ दिवसांपासून गायब आहे. पोलिसांनी या प्रकरणी म्हटले आहे की, सत्यपालचा मृतदेह सोमवारी ताब्यात घेतला आहे.

खुनानंतर ३ महिन्यांनंतर पत्नीला अटक
पोलिसांचं म्हणणं आहे की, जवळपास ३ महिन्यांनंतर तपासणी केल्यानंतर असं समजलं आहे की, मृत पावलेल्या सत्यपालची पत्नी सर्वेशचाच या खुनामागे हात आहे. दोघांचं लग्न ९ वर्षांपूर्वी झालं होतं. दोन मुलं असणारी ही महिला आपल्या पतीपासून अजिबात खुश नव्हती. पोलिस तपासात महिलेने मान्य केले की, सत्यपालच्या गैरहजेरीत तिला आपल्या गरजेच्या वस्तू शेजाऱ्यांकडे मागाव्या लागत होत्या. त्यामुळे ती आपल्या पतीवर नाराज होती.

शेजारच्या तरुणाशी संबंध
नंतर महिलेचे २२ वर्षीय तरुणासोबत संबंध सुरु झाले. विजय असं त्याचं नाव आहे. एका वर्षाच्या नात्यानंतर सर्वेशने सत्यपालला रस्त्यातून बाजूला काढण्याचा निर्णय घेतला. महिलेला विजयसोबत लग्न करायचे होते. आरोपी महिला सर्वेशने विजयला १० हजार रुपये आणि दागिने देत सत्यपालचा खून करण्यास सांगितले. विजय या खुनाची सुपारी शिवव्रत, विपिन आणि छत्रपाल यांना दिली. चौघांनी मिळून सत्यपालचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह जंगलात फेकून दिला.

पोलिसांनी सांगितले की, छत्रपाल व्यतिरीक्त सर्वांना अटक करण्यात आली आहे. सत्यपालच्या खुनाच्या आरोपींना पोलिसांनी खून, खुनाचे पुरावे नष्ट करणे आणि चुकीची माहिती देणे या कलमांनुसार अटक करत जेलमध्ये पाठवलं आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या