धक्‍कादायक ! हनीमूनवर गेल्यानंतर पत्नीला जबरदस्तीने पाजली दारू, नकार दिल्यावर तोंडात भरले काचेचे तुकडे

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जबरदस्ती दारू पाजली आहे. यावर दारूला नकार दिल्यानंतर काचेचा ग्लास पत्नीच्या तोंडावर फेकून मारला आहे. तर तूटलेल्या ग्लासाचे काचेचे तुकडे पत्नीच्या तोंडात टाकले आहे. ही घटना खरतर मार्च मधली आहे, परंतू हे प्रकरण आता पोलीसांसमोर आले आहे.

अलिगड येथे राहणाऱ्या पीडिता महिलेचे मागच्या वर्षी ९ डिसेंबरला लग्न झाले होते. त्यानंतर पती या महिलेला जबरदस्ती दारू पाजत होता. नाही म्हटल्यावर तो तिला मारायचा, एवढेच नाही तर दारूच्या बोटल ग्लास तोडून त्याच्या काचेचे तुकडे तिच्या तोंडात घुसवायचा, असं त्या पिडीतेने सांगितलं आहे. तसंच तिच्या नवऱ्याला सट्टा लावण्याची सवय होती. आयपीएलमध्ये तो सट्टा लावायचा, असंही तिने सांगितलं.

पिडितेच्या सांगण्यांनुसार तिचा नवरा तिचे अश्लील व्हीडिओ बनव्याच्या तयारीत होता. तसंच हे व्हीडिओ दाखवून तो तिला ब्लॅकमेल करण्याच्या तयारीत असल्याचेही तिने सांगितले. तसंच तो पैशांसाठी तिच्या माहेरच्या लोकांनाही त्रास द्यायचा, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, त्याने तिला हनीमुनसाठी दार्जिलिंगला घेऊन गेला. तेथे त्याने तिला दारू पाजली होते. तसंच तेथे तिला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्याने पिडितेला रुमबाहेर काढले. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. तेथून आल्यानंतर पिडितेने तिच्या घरच्यांशी बोलून पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like