पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन
नागपूर येथील ब्राम्होस युनिट मध्ये  काम करणाऱ्या  एका आयएसआय एजंटला अटक करण्यात आली आहे. निशांत अग्रवाल असे या एजंटांचे नाव आहे.  तो पाकिस्तान ला माहिती पुरवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’096f46c0-cae1-11e8-8e6e-fd0f44db908a’]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, निशांत अग्रवाल हा  नागपुरच्या ब्राह्मोस युनिटमध्ये निर्मिती विभागात काम करत होता . त्याला अनेक टेक्निकल गोष्टींची माहिती होती ही माहिती तो पाकिस्तानला पुरवत होता. अग्रवालने आयएसआयला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसने संयुक्त कारवाई करत ही अटक केली. याबाबत अद्याप अधिक माहिती समजू शकलेली नाही.

निशांत अग्रवाल असे संशयिताचे नाव असून मागील ४ वर्षांपासून नागपूर येथील डीआरडीओच्या यूनिटमध्ये कार्यरत आहे. डीआरडीओचे हे यूनिट बुटीबोरी परिसरात आहे. नागपूरला येण्यापूर्वी तो हैदराबाद येथे कार्यरत होता, असे सांगण्यात येते.

नारायण राणेंच्या ‘निलेश फार्म’ हाऊसच्या कंपाऊंडची भिंत तोडली

पहाटेपासून ही कारवाई करण्यात येत होती. निशांतने डीआरडीओशी संबंधित माहिती पुरवल्याचा आरोप आहे. विशेषत: ब्राह्मोसची माहिती दिल्याचा दिल्याचा संशय आहे. निशांतला २०१७-१८ मध्ये उत्कृष्ट शास्त्रज्ञ हा पुरस्कार मिळाल्याचेही सांगण्यात येते. याबाबत अद्याप पुष्टी मिळालेली नाही. या अटकेबाबत नागपूर पोलिसांना अधिक माहिती नाही. कोणताही अधिकारी याबाबत बोलायला तयार नाही. या बाबतीत आता आणखी माहिती उघडकीस आल्यास अनेक बाबी उघडकीस येतील.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4017e4bd-cae1-11e8-9914-6f9d814cf443′]