५ गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या, संपूर्ण राज्यात खळबळ

गाजियाबाद : वृत्तसंस्था – गाजियाबादमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. गाजियाबादमधील भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मसूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. डासनाचे मंडळ अध्यक्ष बी एस तोमर यांच्यावर स्कूटी स्वारांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि तेथून फरार झाले आहेत. या घटनेत बी एस तोमर यांना ५ गोळ्या लागल्या असून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. तर पोलीस फरार झालेल्या स्कूटी स्वारांचा तपास करत आहेत.

ही घटना पोलीस चौकीपासूनच्या काही अंतरावरच घडली आहे. त्यावरून या गुन्हेगारांमध्ये पोलीसांची भिती राहिलेली नाही हेच स्पष्ट होत आहे. घटनेबद्दल पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळाची दखल घेतली. पोलीसांना घटनास्थळी तीन काडतुस सापडले आहे. तर या घटनेमुळे मसूरी ठाण्याचे प्रभारी यांना सस्पेंड करण्यात आले आहे.

भाजपचे नेता डॉ. बी एस तोमर हापुडयेथील सिखेडा गावात राहणारे होते. ते त्यांच्या क्लिनीकमधून बाहेर पडल्यावर तेथे थांबले होते. तेव्हाच तीन लोक स्कूटरवर आले. त्यांनी आजूबाजूला काही न पाहता तोमर यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. ज्यामुळे तेथील लोकांमध्ये पळापळी झाली, तसंच परिसरात भितीचे वातावरण झाले होते. यात तोमर यांना ५ गोळ्या लागल्या होत्या. तेथील लोकांनी त्यांना त्वरात रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

दरम्यान, बी एस तोमर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबातील लोकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. तसच त्यांनी आंदोलनही केले. तोमर यांच्या गुन्हेगारांना त्वरात अटक करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबाने आणि भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. तर पोलीसांनीही त्यांना शांत करत गुन्हेगारांना लवकरच अटक करणार असल्याचे सांगितलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त-