नात्याला काळीमा ! सख्या भाऊ-बहिणीचं जुळलं ‘प्रेम’, ‘त्यांनी’ पळून जाऊन केलं ‘लग्न’

लखनऊ : वृत्तसंस्था – एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सख्ख्या भाऊ-बहिणीने लग्न केलं आहे. एक मुलगी जेव्हा आपल्या मोठ्या भावासोबत घरी परतली तेव्हा ती नववधूच्या अवतारात होती. दाम्पत्यांच्या वेशात असणाऱ्या या भाऊ बहिणीला पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. कुंटुंबियांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यांनी जेव्हा घरच्यांना सांगितलं की, त्यांनी लग्न केलं आहे. तेव्हा घरच्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. उत्तर प्रदेशातील मोहम्मदी परिसरातील ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ असून हे कुटुंब अनुसूचित जातीतील आहे. हे कुटुंब लखीमपूर खीरी येथील बौधि खुर्द गावातील रहिवासी आहेत. या सख्या भावाचं आणि बहिणीचं प्रेम जडल्याने त्यांनी लखनऊमध्ये पळून जात मंदिरात लग्न केलं. त्याच्या सर्व मोठ्या बहिणींचं लग्न झालं होतं. सध्या या विचित्र लग्नाची गावात खूप चर्चा सुरू आहे.

अशी माहिती समोर आली आहे की, या तरुणाचे बहिणीशी संबंध असल्याची चर्चा आधीपासूनच होती. परंतु हे प्रकरण थेट लग्नापर्यंत जाऊ शकतं असा विचार कधीच कोणी केला नव्हता. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Visit : Policenama.com