नोएडामध्ये लज्जास्पद घटना, हॉस्पीटल प्रशासनानं मृतदेह गेट बाहेर ठेवला, FIR दाखल

नोएडा – नोएडातील सेक्टर 33 मध्ये असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह हॉस्पिटलने गेटबाहेर ठेऊन दिल्याची लज्जास्पद गोष्ट येथे घडली. सेक्टर 24 मधील सेक्टर 33 मध्ये असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षकाच्या वेशातील एक व्यक्ती काल संध्याकाळी उपचारांसाठी गेली होती. तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृतदेह गेटबाहेर ठेवण्यात आला. याची माहिती कळाल्यावर गौतमबुद्धनगरचे जिल्हाधिकारी सुहास एल. वाय. यांनी तताडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीची पोस्टमॉर्टेम चाचणी केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.