महाराष्ट्र आणि UP सरकारमध्ये वाढला वाद, संजय राऊत यांनी CM योगींवर साधला निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रवासी मजूरांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील वाद थांबताना दिसत नाही. महाराष्ट्रात प्रवासी मजूरांशी गैरवर्तन झाल्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेने रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, लाखो मजूरांना आम्ही उत्तर प्रदेशात पाठवले आहे. जे लोक पायी चालत गेले त्यांची जबाबदारी आमची नसून केंद्र सरकारची आहे. पण तुम्ही जर त्या मजूरींशी चर्चा केली तर त्यांच्या हृदयातून एकच आवाज येईल, जय महाराष्ट्र.

संजय राऊत म्हणाले, आम्ही अशा भाषेचा वापर करत नाही. परंतु, दुर्दैवाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अशाप्रकारची भाषा वापरतात, ज्यांचा संत म्हणून सन्मान केला जातो. ते महात्मा आहेत. योगीजींनी हे शब्द वापरले आहेत. इतक्या वर्षात मुंबईने पूर्ण देशाच्या प्रवासी मजूरांची देखभाल केली. त्यांची काळजी घेतली आहे आणि ते येथे राहीले, वाढले. त्यांना येथे अन्न आणि निवारा मिळाला. त्यांच्यापैकी अनेक लोक युपीचे होते आणि येथे सद्भावनेने राहात होते. कठिण काळात काही समस्यांमुळे त्यांना परत जावे लागले. केंद्र सरकारची काही धोरणे यास जबाबदार आहेत, लॉकडाऊनमुळे कोणतेही काम होत नव्हते. यासाठी जर कोणी महाराष्ट्राला दोषी मानत असेल तर, ते योग्य नाही.

योगींनी नुकतेच म्हटले होते की, त्यांचे सरकार आपल्या मजूरांना सामाजिक सुरक्षा देईल आणि अन्य राज्यांना उत्तर प्रदेशातून मजूर हवे असतील तर युपी राज्याची परवानगी घ्यावी लागेल. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, जर त्यांना आपल्या लोकांना महाराष्ट्र आणि इतर राज्यात पाठवायचे नसेल तर ही राज्याची जबाबदारी आहे, आमची नाही.

रेल्वे मंत्र्यांना नाराज होण्याची गरज नाही

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आरोप केला होता की, महाराष्ट्र त्या प्रवाशांची यादी उपलब्ध करून देत नाही ज्यांना श्रमजीवी विषेश ट्रेनने प्रवास करायचा आहे. यावर राऊत म्हणाले, याची काहीही आवश्यकता नाही. मला वाटत नाही रेल्वे मंत्रालयाने अन्य राज्यांकडून अशी यादी मागितली असेल. याबातीत महाराष्ट्र सरकारचे काम उल्लेखनीय आहे. आम्ही या बाबतीत सहमत आहोत की, रेल्वे मंत्रालयावर लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी मोठा दबाव आहे. आम्ही जेवढ्या गाड्या मागितल्या होत्या, तेवढ्या मिळाल्या नाहीत. यासाठी कुणी महाराष्ट्रावर टीका करत असतील तर इतके नाराज होण्याची गरज नाही.

ते म्हणाले, जी यादी आम्हाला द्यायची होती, ती दिली गेली आहे. महाराष्ट्र सरकारने लाखो प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी पाठवले आहे. अजूनही असे अनेक आहेत ज्यांना विविध राज्यात जायचे आहे. जर केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करतील तर हे लोक आपल्या घरी पोहचू शकतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like