CO ला धमकावल्याप्रकरणी CM योगींनी स्वाति सिंहांना ‘फैला’वर घेतलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लखनऊ कँटच्या सीओंना धमकी दिल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्री स्वाती सिंहांना समन्स बजावले आहे. सीओंना धमकावल्याप्रकरणी सीएम योगींनी मंत्री स्वाती सिंहांविरोधात हे पाऊल टाकलं आहे. मुख्यमंत्री योगींनी डीजीपींकडून पूर्ण प्रकरणाचा रिपोर्टही मागवून घेतला आहे.

स्वाती सिंह यांचं कथित ऑडिओ उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये व्हायरल होताना दिसत आहे. यात त्या लखनऊच्या सीओला धमकावत असल्याचं ऐकायला येत आहे. हे ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर योगींनी स्वाती सिंहांना फटकारलं आहे. सोबत त्यांच्या या वर्तणुकीने योगींनी नाराजी व्यक्त केली आहे.

व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये स्वाती सिंह एका प्रसिद्ध बिल्डरच्या एफआयआरच्या तपासामुळे रागात होत्या असं दिसत आहे. ऑडिओत स्वाती सिंह या प्रकरणाचा तपास पुढे न जावा आणि बिल्डरविरोधात कारवाई न व्हावी यासाठी दबाव बनवताना दिसत आहे. सध्या हा ऑडिओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये महिला व बालविकास राज्यमंत्री असणाऱ्या स्वाती सिंह लखनऊच्या सरोजनी नगरमधून विधानसभा निवडणूक जिंकल्या आहेत. योगी सरकारमध्ये स्वाती सिंह नेहमीच चर्चेत राहतात.

याप्रकरणी डीजीपी ओपी सिंह म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी दखल घेतली आहे. लखनऊच्या एसएसपीकडे त्याचा तपास सोपविण्यात आला आहे. जे काही होईल ते समोर येईलच.”

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like