मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार का ? CM योगी आदित्यनाथ म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर योगी आदित्यनाथ यांनी अन्य मुद्द्यांवरही मोकळेपणाने चर्चा केली. यावेळी मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मला कोणी बोलावणारही नाही आणि मी जाणारही नाही. जर मी त्या ठिकाणी गेलो तर अनेकांच्या दुकानांना टाळे लागेल, असे त्यांनी सांगितले.

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सर्वधर्मियांना निमंत्रण देण्यात आले होते. आणि ते कार्यक्रमातही सहभागी झाले, यासंदर्भातही त्यांना सवाल करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार नसल्याचे म्हटले आहे. माझे जे काही काम आहे ते मी करणार. बाकी मला त्या ठिकाणी ना बोलावण्यात येईल ना मी जाणार. जर मी त्या ठिकाणी गेलो तर अनेकांच्या दुकानांना टाळी लागतील, असेही त्यांनी सांगितले. माझ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करणे हे माझे कर्तव्य समजतो. माझ्या गुरू परंपरेनं हा संकल्प अनेक दशकांपूर्वी पाहिलेला. तो आता साकार झाला आहे. मंचावर असलेले लोकं राम जन्मभूमीसोबत आत्मियतेने जोडले गेलेले आहेत. हा आमच्यासाठी नक्कीच उत्साहाचा दिवस होता, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.