‘मस्तवाल’ जिल्हाधिकार्‍याचा पर्दाफाश, कार्यालयात वृध्द शिपायाकडून पाय चेपून घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

रायबरेली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील सर्व कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांनी शिस्तीनं काम करण्याची तंबी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. तसेच अधिकाऱ्यांना राज्यातील सर्व कार्यालयात धूम्रपान करण्याची सुद्धा मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचं उघड झालं आहे. रायबरेतील जिल्हाधिकारी कार्यालयात खुद्द जिल्हाधिकारीच मुजोरीपणा करत असल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहे.

जिल्हाधिकारी असलेले नाझीर पवन श्रीवास्तव हे वृद्ध शिपायाकडून आपली कशी सेवा करुन घेत आहेत यावरती सध्या चर्चा सुरु आहे. यामागचे कारणही तसेच आहे. श्रीवास्तव यांनी या वृद्ध शिपायाकडून आपले पाय चेपून घेतले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद असून, या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या मनमानी कारभारावरती आणि या अधिकाऱ्यावरती काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

https://youtu.be/F-xGrroPZpQ

नाझीर पवन कुमार श्रीवास्तव हे त्यांच्याच कार्यालयातील वृद्ध शिपाई राम लखन यांच्याकडून पाय चेपून घेत होते. तेव्हाच हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. लक्षात येताच श्रीवास्तव हे उठून कार्यलयाबाहेर निघून गेले. दरम्यान, घडलेल्या घटनेनंतर कार्यालयातील कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नसल्याचं माहिती मिळत आहे. सदरील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, जिल्हाधिकाऱ्यावर कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.