Homeताज्या बातम्याUttar Pradesh Election 2022 | भाजपचे 2 मंत्री, 6 आमदार, माजी...

Uttar Pradesh Election 2022 | भाजपचे 2 मंत्री, 6 आमदार, माजी आमदार ‘समाजवादी पार्टी’त

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकीच्या (Uttar Pradesh Election 2022) पार्श्वभूमीवर प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राज्यात समाजवादी पार्टीला (Samajwadi Party) चांगली बळकटी मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. तर भाजपला (BJP) एकामागे एक असे मोठमोठे झटके बसताना दिसत आहे. समाजवादी पार्टीचा लखनऊ (Lucknow) येथे एक मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात योगी सरकारमधील 2 मंत्री (Ministers), 6 आमदार (MLA) यांच्यासह 12 पेक्षा अधिक माजी आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या (Uttar Pradesh Election 2022) पार्श्वभूमीवर हा भाजपला मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे.

समाजवादी पार्टीचे नेता आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी दिलेले स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya), धर्म सिंह सैनी (Dharma Singh Saini), भागवती सांगर (Bhagwati Sangar) आणि विनय शाक्य (Vinay Shakya) यांच्यासह अनेक आमदार आणि माजी आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजप आणि बसपाच्या (BSP) एकूण जवळपास 20 माजी आमदारांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. (Uttar Pradesh Election 2022)

यावेळी बोलताना मौर्य यांनी येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे 80 विरुद्ध 20 अशी लढाई असल्याचे म्हणत आहेत पण हा त्यांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात 85 आमचे तर उरलेल्या 15 मध्ये अनेक वाटेकरी आहेत, असा टोला मौर्य यांनी लगावला. उत्तर प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हेच असतील आणि 2024 मध्ये ते देशाचे पंतप्रधानही (PM) होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या हातून कॅच सुटला
यावेळी अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. उत्तर प्रदेशात भाजपच्या विकेटवर विकेट पडत आहेत. अंतिम सामना सुरु झाला आहे. ही आत्मसन्मानाची लढाई आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे आणि ते आता कुणीही रोखू शकत नाही असे त्यांनी म्हटले. योगीबाबांना क्रिकेट खेळता येत नाही. त्यांच्या हातून कॅच सुटला आहे. आता पराभव अटळ आहे. खरंतर येत्या 11 मार्चचं त्यांचं तिकीट होतं. मात्र लखनऊमधील वारे पाहून ते आजच गोरखपूरला निघून गेले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

 

Web Title : Uttar Pradesh Election 2022 | swami prasad maurya dharam singh saini other bjp mlas join samajwadi party in presence of akhilesh yadav

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News