शेतकर्‍यांसाठी खुपच कामाची ‘ही’ स्कीम, 20 पासून 90 टक्क्यांपर्यंत मिळणार सरकारची मदत, जाणून घ्या

लखनऊ (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – योगी आदित्यनाथ सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी बरीच मोठी कामे करीत आहे. त्यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्याची तरतूद आहे. बियाण्यांपासून ते खते व मशीनपर्यंत मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. शेतकऱ्याला जर कोणताही फायदा घ्यायचा असेल तर त्याला त्याच्या जिल्ह्याच्या कृषी उपसंचालकांशी संपर्क साधून लाभ घेता येतो. २० ते ८० टक्के पर्यंतची शासकीय मदत वेगवेगळ्या योजनांमध्ये दिली जाते.

१) २ आणि ३ हॉर्सपॉवरच्या सौर पंप खरेदीवर ७० टक्के आणि यूपीतील ४० टक्के लोकांना ५ हॉर्सपॉवरच्या सौर पंपांवर सरकारी अनुदान मिळू शकते.

२) शेतीसाठी एखादी मशीन खरेदी करायची असेल तर २० ते ५० टक्के सरकारी मदत मिळू शकेल.

३) मशीन बँक बनविण्यावर ४० ते ८० टक्के सूट दिली जाऊ शकते. त्याअंतर्गत शेतकऱ्याला ६० लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प मिळू शकेल. म्हणजेच, आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेऊन, या रकमेसह मशीन खरेदी करता येतील. सरकार शेतकऱ्याच्या प्रकल्पात २४ लाख रुपये गुंतवेल.

४) स्प्रिंक्लर सेटवर ९० टक्के तर कृषी संरक्षण रसायनांवर ५० टक्के अनुदान देण्यात आले आहे.

५) जमिनीसाठी काही विशिष्ट पोषक वस्तू खरेदी करून सरकारला मदत मिळते. झिंक सल्फेटवर ५० टक्के अनुदान, जिप्समवर ७५ टक्के आणि सूक्ष्म पोषक द्रव्यांवरील ५० टक्के अनुदानाची तरतूद आहे.

६) सामान्य धान्य किंवा गहू बियाणांच्या निवडलेल्या प्रजातींवर, २ ते १४ रुपये प्रतिकिलोपर्यंत, डाळीचे बियाणांवर ४० ते ४५ रुपये प्रति किलो आणि तेल बियाण्यांवर प्रति किलो ३३ ते ४० रुपयांपर्यंत सरकारी मदत उपलब्ध असेल.

७) त्याचप्रमाणे हायब्रीड धान्य खरेदीवर १३० रुपये प्रतिकिलो आणि मका व ज्वारीवर १०० रुपयांपर्यंत अनुदान आहे.

८) मागासलेला प्रदेश असल्याने बुंदेलखंडमधील शेतकऱ्यांना तीळ बियाण्यांवर ९० टक्के अनुदान आणि इतर भागातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान आहे.