धक्कादायक ! मित्रांशी फोनवर बोलते म्हणून जन्मदात्या बापानेच मुलीला घातल्या गोळ्या

फिरोजाबाद : वृत्तसंस्था – मित्रांसोबत फोनवर बोलत (phone call) असल्याच्या रागातून (angry) जन्मदात्या बापाने (father) आपल्या मुलीचा (Daughter) गोळ्या घालून खून (murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नवरात्रौत्सवात मध्यरात्री घडली. या घटनेतील आरोपी बापाला पोलिसांनी (police) अटक केली आहे. या प्रकरणी संशयावरुन अटक केलेले तिघे निर्दोष असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री 12 वारजताच्या सुमारास शहरातील रसूलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनगरमध्ये घडली. आरोपी बॅटरी स्क्रॅपचा व्यावसायिक असून अजय खाटिक असे नाव आहे. त्याने आपल्या 17 वर्षाची मुलगी ईशू हिचा घरात गोळ्या घालून खून केला. इशू 12 वीमध्ये शिकत होती. तिच्या डोक्यात गोळ्या घालून तिचा खून करण्यात आला होता. व्यावसायिक मनीष चौधरी, सोपाली यादव, गौरव चक आणि अन्य तीन-चार जणांनी घरात घुसून मुलीचा खून केल्याची तक्रार अजय खाटिक याने पोलिसांत दिली होती.

पोलिसांनी शुक्रवारी रात्री मनीषला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे पोलिसांना सांगितले. तर सोपाली आणि गौरवला शनिवारी रात्री ताब्यात घेतले. मुलीच्या बाप अजय आणि त्याचा भाऊ विजयच्या जबाबानंतर पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. आरोपींना हातात पिस्तुल घेऊन खोलीतून पळताना पाहिले होते, असा आरोप त्याने केला होता. मात्र, निर्दोष असल्याचे तिघांचे म्हणणे होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी मित्रांसोबत फोनवर बोलत असल्याचा संशय आरोपीला होता. घटनेच्या रात्री ईशूने आपल्या मित्रांसोबत फोनवर गप्पा मारल्या. याबाबत अजयला समजले आणि तो संतापला. रात्री 11 वाजता ईशू बहीण आणि भावासोबत खोलीत अभ्यास करत होती. अजयने तिला खोलीत बोलावून घेतले आणि मित्रांशी का बोलते अशी विचारणा केली. तिने नकार दिल्यानंतर अजय संतापला आणि त्याने तिच्या डोक्यात गोळ्या घालून खून केला. या गुन्ह्याची कबुली आरोपीने दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like