‘मीड-डे’ मीलचे ‘थोटांड’ समोर आणणाऱ्या ‘पत्रकारा’विरोधात FIR, मुलांचा ‘मीठ-चपाती’ खातानाचा ‘व्हिडिओ’ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर जिल्ह्यात एका सरकारी शाळेतील मुलांना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मिड डे मील या योजनेअंतर्गत मीठा बरोबर चपाती खात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्य सरकारने तो व्हिडिओ समोर आणणाऱ्या पत्रकाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पत्रकारावर राज्य सरकारची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

मिर्जापूरमध्ये शाळकरी मुलं जमीनीवर बसून मीठ आणि चपाती खात असल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते.

हे पदार्थ देणे आवश्यक –
उत्तरप्रदेशच्या मिड डे मील या वेबसाइटवर सरकारी शाळेत प्रायमरी स्कूलच्या मुलांना देण्यात येणाऱ्या जेवणाची यादी देण्यात आली आहे. ज्यात डाळ, भात, चपाती, भाजी अशा पदार्थांच्या समावेश आहे. मील चार्टनुसार ही विशेष दिनी शाळेत मुलांना फळ तसेच दूध देखील वाटप करण्यात येते.

हा व्हिडिओ जेव्हा शूट करण्यात आला त्या दिवशी शाळेत फक्त चपात्याचं तयार करण्यात आल्या होत्या.
FIR मध्ये सांगितले की ही व्हिडिओ एका स्थानिक पत्रकाराने शूट केला जो जनसंदेश टाइम्समध्ये काम करतो. त्यानंतर हा व्हिडिओ ANI ने देखील फॉरवर्ड केला. त्यामुळे राज्याची देशात बदनामी झाली.

सत्य परिस्थिती –
व्हिडिओ शूट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका विद्यार्थांच्या पालकांनी सांगितले की, येथे खूप गोंधळ आहे, अनेकदा मुलांना मीठ चपाती खायला देतात. तर कधी मीठ भात, खूप कमी वेळा येथे मुलांना दूध देण्यात येते. तेही जास्त देण्यात येत नाही. केळे देखील खूप कमी वेळा वाटण्यात येतात. मागील एक वर्षापासून असे सुरु आहे.

केंद्र सरकारनुसार, मिड डे मील योजनेचा उद्देश आहे की प्रत्येक मुलाला रोज कमीत कमी 450 कॅलरी उपलब्ध करुन द्यायचे आहे. ज्यात कमीत कमी 12 ग्राम प्रोटीन असणे आवश्यक आहे. हे जेवण वर्षातून कमीत कमी 200 दिवस उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त –