‘गर्लफ्रेंड’ नसल्यानं ‘तो’ महिलांना करायचा व्हिडीओ कॉल अन्…

गाझियाबाद : वृत्तसंस्था – महिला आणि तरुणींना व्हॉट्सॲप कॉल करुन त्रास देणाऱ्या एका तरुणाला सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. या तरुणाला गाझियाबाद पोलिसांनी हरयाणामधील रोहतकमधून अटक केली असून त्याचा मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. दीपक (वय-22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ते रोहतकमध्ये राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मोबाईलमध्ये 500 हून अधिक महिला आणि तरुणींचे मोबाईल नंबर आढळून आले असून त्याने त्यांना पाठवलेले मेसेज देखील सापडले आहेत. आरोपी दीपकने मुंबई, दिल्ली, पंजाब, आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील तरुणांना व्हॉट्सॲप करुन त्रास दिल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीने महिला आणि तरुणींना व्हिडीओ कॉल केल्याची कबुली चौकशी दरम्यान दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी दीपक विरोधात गाझियाबादच्या कविनगर पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर सायबर सेलने ही कारवाई केली.

या संदर्भात गाझियाबादचे शहर पोलीस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी सांगितले की, आरोपी दीपक हॉट्सॲपच्या मदतीने महिलांना त्रास देत होता. कविनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आयपी ॲड्रेसद्वारे सायबर सेल आरोपीपर्यंत पोहचले. आरोपीला तरुणी आणि महिलांसोबत गप्पा मारायला आवडत असल्याने त्याने हे कृत्य केले आहे. गर्लफ्रेंड नसल्याने तो तरुणीशी बोलण्यासाठी हे कृत्य करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अटक करण्यात आलेला आरोपी मोबाइलवरून कोणताही नंबर डायल करायचा. जर कॉल एखाद्या महिलेने उचलला तर, तिचा क्रमांक सेव्ह करुन व्हॉट्सॲप मेसेज पाठवत होता. तसेच व्हिडीओ कॉलही करायचा. आरोपीला अटक केली असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक कालानिधी यांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like