दरोडेखोरांनी कुटूंबाला ‘बंधक’ करून केली ‘लूटमार’, महिलेचा खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील चार सशस्त्र दरोडेखोर एका घरात घुसले आणि कुटूंबाला बांधून ठेवून घरातील रक्कम लुटून नेली. याप्रकरणी विरोध केला असता महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

लोनी बॉर्डर पोलिस स्टेशन परिसरातील कॉलनीत असिफ अली आपल्या कुटूंबासह राहतो. शनिवारी रात्री आसिफ, पत्नी समरीन आणि एक मुलगा घराच्या तळ मजल्यावर झोपले होता, तर आसिफचा मुलगा आणि त्याचा मेहुणे घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत झोपले होते. रात्री उशिरा सशस्त्र दरोडेखोरांनी घरात घुसून सर्व लोकांना बांधून ठेवले. यानंतर त्यांनी लूटमार केली. यावेळी, आसिफची पत्नी समरीने विरोध केला असता, दरोडेखोरांनी तिचा गळा दाबून खून केला.

सकाळी आसिफने आरडाओरड करत शेजार्‍यांना बोलावले, त्यांनी कुटुंबाची सुटका केली आणि स्थानिक पोलिसांना कळविले. असिफने तात्काळ पत्नी समरीनला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, दरोडेखोरांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि कपाटात ठेवलेले सुमारे दीड लाख रुपये घेऊन फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एसपी देहात नीरज जादौन यांनी सांगितले की, संपूर्ण घरातील लोकांना बांधून ठेऊन रात्री उशिरा दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. यावेळी एका महिलेची दरोडेखोरांनी हत्या केली आहे. ते म्हणाले की, सध्या आजूबाजूला बसविलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज शोधले जात असून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/