Coronavirus : क्वारंटाइन मध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयाच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्याचा प्रयत्न, आवाज ऐकून लोकांनी वाचवलं

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्याच्या परसपूर पोलीस ठाणे क्षेत्रात संतापाने एका मध्यमवयीन व्यक्तीच्या गुप्तांगात रॉड टाकण्याचा प्रयत्न करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. परिस्थिती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात भरती केले गेले आहे. परसपूर पोलीस ठाणे क्षेत्राच्या रुदोली गावात राहणाऱ्या लक्ष्मी नारायण यांचा मुलगा राम प्रताप (वय ५५ वर्ष) कुठेतरी बाहेर राहत होता. तो गावात आला होता.

त्यामुळे प्रधानांनी त्यांच्यासाठी १४ दिवस गावच्या शाळेत राहण्याची व्यवस्था केली. राम प्रताप यांनी गुरुवारी ते शाळेत असल्याचे सांगितले. याच दरम्यान तीन जण आले आणि त्यांनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दोन जणांनी त्याचे हात धरले. त्यानंतर एका युवकाने त्यांच्या गुप्तांगात रॉड टाकण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान तो वेदना होत असल्याने ओरडला. मग गावातील काही लोकं त्याचा आवाज ऐकू आल्याने येऊ लागले. लोकांना येताना पाहून हल्लेखोर पळून गेले. पीडित राम प्रताप म्हणतात की, त्यांच्याबरोबर त्यांचा जमीन वाद बराच काळ चालू आहे. यापूर्वीही बर्‍याच वेळा वाद झाला आहे.