मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा २२ कोटी नागरिकांना ‘झटका’, पेट्रोल 2.50 रूपयांनी महाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने सर्वसामान्य नागरिकांना झटका दिला असून १० महिन्यांपूर्वी रद्द केलेला व्हॅट पुन्हा लागू केला आहे. यामुळे पेट्रोलच्या किमतींमध्ये लिटरमागे २.३३ रुपये तर डिझेलमागे प्रतिलिटर १ रुपयांची वाढ होणार आहे. यामुळे राज्यातील २२ कोटी जनतेला भुर्दंड पडणार असून कालपासून नवीन दर लागू झाले आहेत. यामुळे आता राजधानी दिल्लीत पेट्रोलचे भाव ७३.६६ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे भाव ६५.२८ रुपये प्रतिलिटर झाले आहेत.

४००० कोटी रुपये उत्पन्न वाढणार
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे पेट्रोलवरील २६.८० टक्के व्हॅट तर डिझेलवरील १७.४८ टक्के व्हॅट वाढणार आहे. यामुळे राज्याच्या तीजोरीत मोठी भर पडणार असून वर्षाला ४००० कोटी रुपये उत्पन्न वाढणार आहे.

१० महिने आधी हटवला होता व्हॅट
राज्य सरकारने १० महिन्यांपूर्वी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा व्हॅट रद्द केला होता. त्यावेळी पेट्रोलवरील ३.५६ टक्के तर डिझेलवरील ३.४८ टक्के व्हॅट कमी केला होता. मात्र आता पुन्हा यामध्ये मोठी वाढ केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त