योगी सरकारकडून शहिदांच्या कुटूंबियांना मोठी मदत ; कुटूंबाला 25 लाख तर एका सदस्याला नौकरी

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काश्मीरच्या अनंतनाग येथे झालेल्या हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कुटूंबातील एका सदस्याला सरकारी नौकरी देण्याची घोषणा देखील केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हंटले की, शहिदांच्या स्मरणार्थ एका रस्त्याला शहिदांचे नाव देण्यात येईल.

दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला होता तसेच ग्रेनेड देखील फेकले होते. या हल्यात शहीद झालेल्या पाच जवानांपैकी २ जवान उत्तरप्रदेशचे आहेत. त्या दोन जवानांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २५ लाखाची आर्थिक मदत आणि परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या जवानांना श्रद्धांजली दिली. त्यांनी म्हंटले की, जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. पूर्ण उत्तरप्रदेश राज्य आणि देश त्यांच्यासोबत उभा आहे.

 

You might also like