धक्कादायक ! काकी अन् पुतण्याचा मृतदेह एकाच घरात सापडल्यानं प्रचंड खळबळ, तरूणाचं 15 दिवसांनंतर होणार होतं लग्न

हमीरपूर : पोलीसनामा ऑनलाईन –   अवघ्या 15 दिवसांवर तरुणाच लग्न आले होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. पण त्याआधीच त्याच्यासह त्याच्या काकीचा मृतदेह एका पडक्या घरात आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये शनिवारी (दि. 27) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्या या संशयास्पद मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सत्येंद्र (वय 25) आणि त्याची काकी संतोषी (वय 35 दोघेही रा. शिलाजीत ) असे मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सत्येंद्र याचा मृतदेह जनावराच्या गोठ्यात सापडला. तर त्याची काकी संतोषी हिचा मृतदेह तेथून जवळच 30 मीटरवर आढळून आला. मृताच्या गळ्याभोवती साडी गुंडाळलेली होती. घटनेची माहिती मिळताच, जरिया पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलीस अधीक्षक नरेंद्र कुमार सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस निरीक्षक राजेश कुमार वर्मा म्हणाले की, प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसते. पुतण्याचे लग्न ठरले होते. या घटनेचा विविध दिशेने तपास केला जात आहे. मृत तरुणाजवळ मोबाइल सापडला आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समजते. कुटुंबीय आणि गावातील ग्रामस्थांकडून ही माहिती दिली जात आहे. मृतदेह विच्छेदनासाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतरच मृ्त्यूचे कारण स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. सत्येंद्रचे पंधरा दिवसांनंतर लग्न होते. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.