हाथरस कांड : आता UP च्या बाहेर ट्रान्सफर होणार नाही ट्रायल, HC करणार देखरेख – SC चा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या गँगरेप कांडबाबत मंगळवारी सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने आता केसच्या ट्रायलला राज्याच्या बाहेर शिफ्ट करण्यास नकार दिला आहे, सोबतच म्हटले आहे की, जेव्हा प्रकरणाचा तपास पूर्ण होईल, त्यानंतर ट्रायल बाहेर ट्रान्सफर करण्यावर विचार केला जाऊ शकतो. सोबतच या प्रकरणाची देखरेख आता अलाहाबाद हायकोर्टच करेल.

सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले की, आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे, अशावेळी ताबडतोब ट्रान्सफरचर गरज नाही. अन्य इतर बाबींबर हायकोर्टाचे सुद्धा लक्ष आहे.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान युपी सरकारद्वारे देण्यात आलेले प्रतिज्ञापत्र स्वीकारले. ज्यामध्ये राज्य सरकारने दावा केला होता की, पीडितेचे कुटुंब, केसशी संबंधीत साक्षीदार मजबूत सुरक्षा देण्यात आली आहे. सोबतच केस सीबीआयकडे ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती.

मात्र, न्यायालयाने हे सुद्धा म्हटले की, तपासाची देखरेख हायकोर्ट करत आहे, अशावेळी सुप्रीम कोर्टानी देखरेख ठेवण्याची गरज नाही. सध्या प्रकरणाचा तपास होत आहे अशावेळी सुरूवातीच्य स्टेजमध्येच दिल्ली किंवा इतर ठिकाणी ट्रायल ट्रान्सफर करण्यावर विचार करता येणार नाही.

14 सप्टेंबरला युपीच्या हाथरसमध्ये वाल्मिकी समाजातील तरूणीवर गँगरेप झाला होता, ज्यानंतर 29 सप्टेंबरला पीडित तरूणीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या इच्छेविरोधात मध्यरात्री मृतदेह जाळून टाकल्याने मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यानंतर प्रकरण हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात गेले होते.

सर्वोच्च न्यायालयाने युपी सरकारला पीडित कुटुंबाला सुरक्षा देण्याचा आदेश दिला होता. ज्यानंतर राज्य सरकारने आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा सुरूवातीचा तपास राज्य सरकारने गठित केलेल्या एसआयटीने केला होता, ज्यानंतर केस सीबीआयला ट्रान्सफर केला होता. सीबीआय प्रकरणाचा तपास करत आहे.