पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले, १०० हून अधिक प्रवासी जखमी

कानपूर : पोलिसनामा ऑनलाइन – उत्तर  प्रदेशातील कानपूरमध्ये पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे अचानक घसरले असून या अपघातात १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हावडा येथून दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेसला शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

कानपूरपासून १५ किमीवर दूर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला आहे. या दुर्घनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या १२ डब्यामध्ये ८ एसी कोच आणि पेंट्रीचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच रात्री अडीच वाजता जिल्हाधिकारी, एसएसपी, ३० रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु झाले आहे. एनडीआरएफच्या ४५ जणांची फौज डब्यात अडकलेल्यांना बाहेर काढत आहेत. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like